
0
4
0
9
0
3
गाव फितूर झालंय
शहरातील हवा राजे हो , गावाकडे आली
अन् आपुलकीची ओल, विसरली मायबोली
हिरव्या गाव झाडावर, चढली अमर वेली
आणि शेजारची बुढ्ढी, अन्नावाचून मेली
लक्ष्मीच्या मंदिरात, येऊन बसली काली
अन् शांतता गावातील, पार लयास गेली
बालिकेला बघून चढते, बुढ्यावरती लाली
अन् नैतिकता इथली, ढासून दारू प्याली
युवक- युवती भर चौकात, चुंबन घेती गाली
लाज- शरम इथलीही, विकून मोकळी झाली
बागेतील फुल , कुस्करतोय स्वतःच माली
गाव फितूर झालंय, सभ्यतेला नाही वाली
वनिता गभणे
आसगाव, जि.भंडारा
0
4
0
9
0
3





