
0
4
0
8
9
9
अंधारयात्री
कित्येक युगे लोटलीत तरी
वाट्याला आल्यात काळोख रात्री
नवचेतना जागविणारी
तरीही ठरलीय अंधारयात्री…!!१!!
काळ बदलला प्रगती झाली
समस्या मात्र तीच राहिली,
पन्नास टक्के आरक्षणातही
हुंडाबळी जातांना पाहिली…!!२!!
आजची स्त्री सक्षम म्हणतांना
का होतात बलात्कार?
आत्मचिंतनाने होणार का
नराधमांना साक्षात्कार…!!३!!
सामर्थ्य सिद्ध करतांना
झालीय ती अवकाशयात्री,
अमानुषतेच्या या बाजारात
अविश्वसनीय ठरतेय मैत्री…!!४!!
सृजनाच्या वाटा मोकळ्या
करीत राहिली जीवनभरी,
प्रकाशज्योत चेतवूनही
ठरलीय ती ‘अंधारयात्री’…!!५!!
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
0
4
0
8
9
9





