
0
4
0
8
9
0
हक्काची माया
साध तू संवाद नात्यामध्ये
मनात उगी आढी का धरतो
जाता वेळ ही निघून एकदा
बिनकामाचा वियोग करतो
हक्काची माया ही सोडून
मृगजळामागे का धावतो
वृद्धाश्रमातील मायबाप हे
पुत्रविरहाने रोज रडवतो
भौतिक सुखाचा हव्यास हा
खऱ्या वैभवापासून दुरावतो
मिथ्या दिखाऊपणाचा तोरा
चारचौघात घेऊन मिरवतो
क्षणभंगूर जीवन असुनही
असत्याशी नाळ जोडतो
स्वार्थापोटी नात्यागोत्याची
हक्काची माया कशी तोडतो
भविष्याच्या स्वप्नविलासात
वर्तमान हा तुलाच छळतो
जग जीवन तू वास्तववादी
काळही मग तुजवर भाळतो
बळवंत शेषेराव डावकरे
जिल्हा नांदेड
0
4
0
8
9
0





