0
4
0
9
0
3
श्रावणधारा
मृदु गंधात हरवलेला
माय धर्तरीचा बाण
तहानेने व्याकुळ ती
पडला तिच्यावर ताण
मेघ राजा तो आकाशी
काळे निळे ढग उपाशी
मेघ गर्जना करू पाहतो
येण्यास तो धजावतो
मिळेना संधी त्याला
लागतो येण्याच्या मार्गाला
डोक्यावरती चढतो पारा
बरसू लागतात श्रावण धारा
मृदु गंधात लपलेला बाण
उफाळून येतो वरती
बळीराजा होउन जागा
जात असतो शेतावरती
मृग नयन मोर पंखी
चहकुण नाचतो रानात
उडती फुलपाखरे प्रितीचे
रानफुले उठती फुलून मनात
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
=========
0
4
0
9
0
3





