
0
4
0
9
0
3
भीमराया
भीमरायापरी , आता कोणी नाही।
नेते झाले खूप, असा ज्ञानी नाही।।
बोले तैसा चाले, माझा भिमराव।
आज भाषणात, तशी वाणी नाही।।
कशी सुरू आहे, जनसेवा इथे।
स्वार्थी नेते आहे, खानदानी नाही।।
जातीभेदा पायी, महाड पेटले।।
दंडात कुणाच्या, आता पाणी नाही।।
अभ्यासाचे ढोंग ,करता कशाला।
भीम प्रकाशाची, शामदानी नाही।।
श्वास भीम आहे, प्राण भीम आहे।
जयभीम बोलू, दुजा शानी नाही।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
============
0
4
0
9
0
3





