0
4
0
9
0
3
सुखाची चव
कधीतरी नशिबाची नजर
आम्हावरही खिळावी॥
इतरांप्रमाणेच आम्हालाही
सुखाची चव मिळावी॥॥॥॥
इतरांच्या जशा होतात
इच्छा आकांक्षा पूर्ण॥
आम्हालाही संपन्नतेची
अवीट गोडी कळावी॥॥॥॥
मनी अभिलाषा ऐहीक
सुखाची अन् ऐश्वर्याची॥
आमच्याकडेही समृध्दीची
कृपादृष्टी वळावी॥॥॥॥
असे ठाण मांडूनी बसलेत
हे दारिद्र्य अन् ही गरिबी॥
कधीतरी आमची परिस्थिती
वैभवाकडे ढळावी॥॥॥॥
डाॅ.नझीर शेख राहाता
जि.अहिल्यानगर
0
4
0
9
0
3





