
0
4
0
9
0
3
योगा’योग’च
योगा’योग’च ही संकल्पना
पूर्वी पासून मानत आलोय
शरीर भाव वाढत गेला अन
चित्ताचाच नाश होत गेलाय..!
योगा देई प्राधान्य स्थूल शरीराला
रोगमुक्ती, सुडोल,सुंदर दिसाण्याला
आवरण अत्म्याचे सजण्याला,
केवळ शरीर स्वास्थ्य टिकण्याला..!
समग्र योग लाभ सर्वांगी देई
तन, मन,आणि आत्मभाव येई
माणूस माणसाला जोडला जाई
मनुष्य धर्म हेच सत्य प्रतीत होई..!
योगासन म्हणजे नव्हे योग
अध्यात्म हा समज दूर करी
योगी,भोगीतला भेद कळतो
योगा’योग’च असला हा जरी..!
‘वसुधैव कुटुंबकम’साकारण्या
यम,नियम,योग, आसन,प्राणायाम
प्रत्याहार,धारणा,अन ध्यान समाधी,
समग्र योगच नेई अंती निजधाम..!
समग्र योगच नेई अंती निजधाम..!
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर (गुजरात)
==========
0
4
0
9
0
3





