‘जीवन सफर’ करा मस्तीने…!!!
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे

‘जीवन सफर’ करा मस्तीने…!!!
देवाने मानवाला प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता दिलेली आहे. या बुद्धीचा वापर मानव अनेक ठिकाणी करतो. हल्ली सगळे तंत्र युगीन दिवस असल्याने मानव विविध संशोधन करून त्यामार्फत जीवन जगत आहे. हे झाले आयटी क्षेत्रातील कार्यरत मानवाचे जीवन. हल्ली सर्व तरुण मंडळी यात गुरफटत चालले आहेत. साधा सरळ माणूस जर का आपण घेतला की जो मध्यम वर्गातील आहे, या माणसाला आपले जीवन जगताना मानसन्मान याचा विचार करावाच लागतो. काही ठिकाणी मान सन्मान बाजूला ठेवून बोलावे लागते. अशावेळी तो आपल्या तत्वांचा विचार करतो. आणि जीवन जगण्याची कला आत्मसात करून त्यानुसार जीवन जगत असतो. वाद- विवाद, चांगले- वाईट, समज- गैरसमज, प्रेम- द्वेष, इत्यादी जीवनाच्या पैलूवरती भोवती स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करीत असतो.
गरीब घरातील किंवा झोपडपट्टीमध्ये राहणा-या माणसाला बऱ्याच अंशी काही वेळेला बोलण्याची कला अवगत नसते. काय बोलावे हे समजत नाही. समोरचा माणूस नीट नाही बोलला तर, हा पण त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देतो. आपण याला म्हणतो, ‘अरे म्हटलं की कारे म्हणणारा’ हा माणसाचा तांडा असतो. या माणसांमध्ये सहनशक्तीचे प्रमाण कमी असते. काही झाले की लगेच वादाला वाचा फोडणारी ही माणसं. याचे कारणही तसेच असते शैक्षणिक किंवा बौद्धिक विकास यांचा कमी झालेला असल्याकारणाने समाजामध्ये वावरताना त्यांना महत्त्वाचा दर्जा किंवा महत्त्वाचे स्थान प्राप्त न झाल्याने हे असे बोली भाषेमध्ये अडकले जातात.
यामध्ये मानव म्हणून त्यांचा काहीही दोष नसतो. त्यांच्या घरातील, आजूबाजूचे वातावरण ज्या वातावरणात ते वाढलेले असतात त्या वातावरणाचा त्यांच्या मानवी बुद्धीवर परिणाम होतो आणि ते तसेच वागायला सुरुवात करतात. बऱ्याच अंशी समाजातील आपले स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना या भाषेचा वापर करावा लागतो. त्यातील शिक्षण घेतलेल्या काही व्यक्ती आहेत. त्या व्यक्ती समाज सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जर साथ समाजाची चांगली मिळाली तर तिथे उत्तम नागरिक तयार होतो हे मात्र विसरता कामा नये.
उच्चभ्रू माणसांची एक जगण्याची पद्धत किंवा रीत खूप वेगळी असते. त्यांचा जन्म उच्चभ्रू घराण्यात झालेला असतो. अशावेळी त्यांच्या मनात खूप काही असते. पण समाजापुढे ते ‘एक्सपोज’ करू शकत नाहीत. साध्या माणसासारखे जीवन त्यांना जगताच येत नाही. कारण त्यांचा जन्म घराणेशाहीमध्ये झालेला असतो. रॉयल आणि आर्थिक सुबत्ता असलेल्या घराण्यात झालेला जन्म त्यामुळे त्यांना चेहऱ्यावर मुखवटे घालून समाजात वावरावे लागते.
या माणसांचा संबंध राजकारण्यांशी येत असल्याने त्यांना राजकारणी ऑफिस, बँक ऑफिस, समाज या सर्वांशी एका वेगळ्याच अटीट्यूडने वागावे लागते. आर्थिक सुबत्ता नसली तरीसुद्धा आर्थिक सुब्बत्ततेचा मुखवटा घालून त्यांच्याशी संवाद साधावे लागतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे घराणे सरकारशाहीचे असते. मग यामध्ये त्यांना मन मरून जगावे लागते. आपल्यातल्या कला अवगत आहेत त्या बाजूला ठेवून राहावे लागते. अगदी कपडालत्ता सुद्धा आपल्या घराणेशाहीला शोभेल असा घालावा लागतो.पेहराव तसाच करावा लागतो.
आपल्यातल्या ज्या काही इच्छा अतृप्त राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी घरातलाच एखादा दिवाणखाना, कोपरा शोधावा लागतो. आपल्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा काही वेळेला ते एक्स्पोज करायला जमत नाही. कारण काय तर घराणेशाहीचा मुखवटा परिधान केलेला असतो. दीन- दुबळ्या व्यक्ती कष्टाने पुढे जातात. तर घराणे शाळेतल्या व्यक्ती आर्थिक सुबत्ता आधीपासूनच त्यांना मिळालेली असते. एकंदरीत काय तर सर्व माणसांच्या जीवन जगण्याच्या कला,पद्धती वेगवेगळ्या आहेत. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याला रात्री झोप लागत नाही. त्याला सतत कामासाठी धावावे लागते. त्यांचा प्रपंच एवढा मोठा असतो की त्यांना सगळं सांभाळावं लागतं. मग अशावेळी त्यांना टेन्शन येतात. आर्थिक नुकसानीला सुद्धा बळी पडावे लागते. टेन्शन घेऊन आजारपणा मागे लागतात. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यातूनही काही जण असतात की ते स्वतःच्या तब्येतीकडे खूप छान लक्ष देतात.
तसे गरीब आणि मध्यम वर्गाला एवढा विचार करावा लागत नाही. जे आहे ते खर्चून रिकामे होतात.भविष्याची चिंता करत बसत नाहीत.भविष्याची थोडी फार चिंता करायला हवी हे मान्य आहे. काही जण त्यातूनही भविष्याच्या चिंतेसाठी काही पैसा राखीव ठेवलेला असतो. अशी ही दीनदुबळे, मध्यमवर्ग आणि श्रीमंत वर्ग यांच्यातली जीवन जगण्याची कला जरा हटके जरा वेगळी असल्याकारणाने प्रत्येकाच्या स्वभावामध्ये सुद्धा फरक पाहायला मिळतो.
“मानवा जीवन दिले देवाने, जीवन जग तू नव युक्तीने,
सर्व समाजाला साथीने घे, कार्य करून दाखव तू मानवतेने.”
जर असं झालं तर किती छान होईल ना! फक्त समाजामध्ये मानव ही जात हवी. श्रीमंत – गरीब हा फरकच नको मानवामध्ये. पण जन्म कुठे घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून नाही. दैवाने जन्म मिळाला त्या घराण्यात आपला जीवन जगण्याचा प्रवास सुरू होतो. या जेवण जगण्याच्या प्रवासामध्ये मानव आणि मानव होऊन जगावे. इतरांना सहकार्य करावे. मानव जातीचा अभिमान बाळगावा. आपल्या बुद्धीचा योग्य तो वापर करावा. मी फक्त इतकंच म्हणेन की, “जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे….” मनातील इच्छा, आकांक्षा या ‘जीवनसफर’मध्ये पूर्णत्वास न्याव्यात. त्या इच्छांची होळी करू नये. मस्त रंगपंचमी सारखे जीवन जगावे….!!!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
========





