आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ
मालेवाडा येथील मुलींची कबड्डीच्या अंतिम सामन्यात बाजी
रजत डेकाटे प्रतिनिधी भिवापूर/ मालेवाडा
0
4
0
9
0
3
मालेवाडा येथील मुलींची कबड्डीच्या अंतिम सामन्यात बाजी
रजत डेकाटे प्रतिनिधी भिवापूर/ मालेवाडा
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर/ मालेवाडा: (दि १३) उमरेड तालुक्यातील विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम वायगाव घोटुर्ली येथे आनंदात पार पडला. विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील कनिष्ठ गटातील कबड्डीच्या अंतिम सामन्यात उच्च प्राथमिक शाळा मालेवाडा येथील मुलींनी बाजी मारली. या केंद्र नंतर तालुका आणि आता विभाग जिंकला.
मालेवाडा येथील कबड्डीच्या अंतिम सामन्यात कनिष्ठ गटातील मुलींनी विजय खेचून आणल्यानंतर शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू दिसून आले. विजयाबद्दल पाहमीचे केंद्रप्रमुख प्रशांत टेंभुर्णे व सामाजिक कार्यकर्ते चेतनदादा पडोळे यांनी विजयी चमूचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
0
4
0
9
0
3





