0
4
0
9
0
3
धन्य महाराष्ट्र भूमी
महाराष्ट्र माझा रांगडा
कुस्तीचा डाव इथे रंगतो
मनामनात आहे आखाडा
आम्ही परंपरा जोपासतो ||१||
महाराष्ट्राची शान आहे लावणी
संस्कृतीचा अनमोल ठेवा
नृत्य कलेची बावनखणी
जगाला वाटावा हेवा ||२||
संतपरा आमचा आहे अभिमान
संतांनी दिली संस्कारांची शिदोरी
सदगुणांची इथे आहे खान
नाही चालणार कुणाची मुजोरी ||३||
छत्रपती शिवरायांचे आम्ही शिलेदार
गडकोट आमचा अभिमान
स्वराज्य स्थापनेचा केला मोठा निर्धार
शिवराय आमची आन-बान शान||४||
थोर महात्मे इथे जन्मले
डॉ बाबासाहेब, सावरकर अन् फुले
देशासाठी त्यांनी जीवन अर्पिले
समानता,स्वतंत्रता लाभली त्यांच्याचमुळे ||५||
गौरी संतोष नेर्लेकर
ता.नेवासा.जिल्हा अहिल्यानगर
0
4
0
9
0
3





