0
4
8
2
9
7
झंझावात
तो झंझावात
ती कर्म असोशी
नि कामावरी निष्ठा
अन् घरावरी प्रीती
नच कुणा कळले
न कुणी देखियले
आत्ममग्न स्वमध्ये
सारेच ते तू झेलले
मंदावतो झंझावात
गात्रे शिथिल जाहली
कर्तव्यभूमी अन् गृह
पुन्हा नव्याने रमली
तू जिथे आहे तिथेच
आहेस बरं थांबलेली
उचलून बघ जरा नजर
क्षितिज तुज खुणावते
झंझावात होण्या पुन्हा
लेखणी नव्याने बोलावते
वैशाली उत्तम अंड्रस्कर
जि चंद्रपूर
========
0
4
8
2
9
7



