Breaking
कवितानागपूरबीडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

दवबिंदू राजश्री मिसाळ ढाकणे जिल्हा बीड

0 4 8 2 9 7

दवबिंदू

हिवाळ्यात भल्या पहाटे
मोत्यांची सजली आरास
पान फुले नि गवतावरती
दवबिंदू विलोभनीय खास…

चमचम चमचम शुभ्र रूप
स्पर्श करता जाते निसटून
कशासाठी मग बसते उगी
भल्या पहाटेस नटून थटून…

पानपानावर अलगद सजते
सुंदर सुंदर रांगोळीची नक्षी
नानाविध आकारात भासतो
थुई थुई नाचणारा मोर पक्षी…

कधी वाटते हा तर शुभ्र
निलगगनीचा चांदणचुरा
सर्व गाढ निद्रेत असताना
उतरून आलाय खराखुरा…

रविकिरणाचे दर्शन घेऊन
दवबिंदूची संपते कहाणी
क्षणभराच्या जीवनात ठेवी
कीर्तिमय गंधित आठवणी…

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे