
0
4
0
9
0
3
प्रितीची वेल
प्रितीची वेल
मनी फुलावी
हास्यसुंदरी
जीवनी यावी. ॥ १
तुझ्यात माझा
जीव गुंतला
ओढ तुझी ती
खुणवी मला. ॥ २
निर्माण झाले
अनोखे नाते
मन ते माझे
मोहून जाते. ॥ ३
गुंतलो आज
स्वप्नात गोड
वेडया प्रितीला
नाही ग तोड. ॥ ४
सांगतो आता
असे जगावे
प्रितित राणी
रंगूनी जावे. ॥ ५
दीपककुमार सरदार
ता लोणार जि. बुलढाणा
=========
0
4
0
9
0
3





