
0
4
0
9
0
3
मन काही भरत नाही
किती विशाल असतं मन,
हे ब्रह्मांडापेक्षा कमी नाही,
कितीही टाकलं त्यात जरी,
मन काही भरत नाही…!!१!!
मिळू दे सुख कितीही,
ते नेहमीच कमीच वाटतं,
मिळालं कितीही जरी,
मन काही भरत नाही….!!२!!
कराल प्रेम कितीही,
तरी ते पूर्ण होत नाही,
प्रेमविरहात बुडालं जरी,
मन काही भरत नाही…!!३!!
लालसा संपत्तीची,
कधीच संपत नाही,
मिळाली कितीही जरी,
मन काही भरत नाही…!!४!!
लागू नका मागे मनाच्या,
ते सापडणार नाही,
वाळवंटाचं मृगजळ जरी,
मन काही भरत नाही…!!५!!
डॉ. बालाजी राजुरकर
हिंगणघाट, जि. वर्धा
=========
0
4
0
9
0
3





