
0
4
0
8
9
1
संतांची भूमी
महाराष्ट्र माझी आहे
भूमी संत सज्जनाची
इथे नांदते चैतन्य
खाण आहे संस्कृतीची ॥
ज्ञानदेव माऊलीने
पाया रचिला पंथाचा
तुकोबांनी चढविला
कळस सांप्रदायाचा ॥
गोर्हा,सावता,जनाई
सेना,चोखा,नामदेव
पंथ वेगळे असती
मनी वसे एक भाव ॥
मानवतेची शिकवण
दिली सकल संतानी
अभंग,भजनातुनी
रंगुन गेले किर्तनी ॥
ऐसा संताचा महिमा
काय वर्णवू मी आता
संताची भूमी ही माझी
चरणी ठेवितो माथा ॥
दत्ता काजळे
तुरोरी, जि.धाराशिव
========
0
4
0
8
9
1





