0
4
0
8
9
2
मनातलं मनाशी
मनातलं मनाशी
करावं कधी हितगुज
मिळेल दिशा योग्य
करण्या आगेकुच !!
भरकटते कधी मन
लालूच दिसता
मनच शमवील तुझ्या
मनाची चिंता !!
आपला परका
नको करू दुजाभाव
मन सांगेन तुला
कुणास निवडावं !!
असता साक्षात
ग्रहलक्ष्मी घरा
तोच तर मनाचा
कप्पा दुसरा !!
म्हणून हे मानवा कर
मनातलं मनाशी गुज
भवसागरी तारू अडता
राखेल तुझी बुज !!
बी.आर.पतंगे (beeke )
जि.अहिल्यानगर
=========
0
4
0
8
9
2





