
0
4
0
9
0
3
मोर नाचरा हवा
मोरा रे मोरा बघून तुझी
सुंदरता वाटे आम्हा हेवा
मुलांनी मग हट्ट केला
आम्हा मोर नाचरा हवा
पाऊस आला की
पुलवतोस पिसारा
हिरव्या रानामधी
किती तुझा पसारा
निळे निळे पंख तुझे
डोळे काळे पाणीदार
पक्ष्यांचा शोभतोस राजा
रंग तुझा किती शानदार
खुलून आला भूवरी
आभाळाचा निळा रंग
ताल धरूनी गीत गा
नाचतील मुलं तुझ्यासंग
रंगीत, रंगीत पिसारा
फुलवून नाचतोस
मोरा तू राष्ट्रीय पक्षी
मुलांना फार आवडतोस
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
0
4
0
9
0
3





