
गळफास
स्वतःच निर्माण केले
त्या परिस्थितीला,
हिंमतीने सामोरे जायचे असते,
खचून जावून जीवन संपवीने,
हें कांही,समस्येचें उत्तर नसते.
स्वस्त झाला होता का जीव तुला?
गळफास आळवून मुक्त झालास,
ज्यांच्यावर टाकायचास,जीव ओवाळून
त्यांनाच आज पोरके करून गेलास.
होता कोणता? प्रश्न असा कीं
जो तुला नव्हताच, सुटत,
कर्जाचा डोंगर फेडता येईना म्हणून
का केलास जीवनाचा अंत.
संकटाचा जरी भडीमार होता
तरी,मार्ग काढलाच असता,
भेकडपणाने,गळफास आवळून
मरण्याचा मार्ग कांही अंतिम नव्हता.
मायबाप,आणि बहीण भाऊ
रडतात सारे हंबरडा फोडून,
केविलवानें लेकरे आपली
टाहो फोडी धाय मोकलून.
सुखी संसारअन बायको पोरे
उघड्यावर पडतील माझ्यानंतर,
सावकार फोडील लचके त्यांचे
केलास का विचार?आत्महत्या अगोदर.
तोंडावर सहानुभूती दाखवणारे
पाठीशी टीका टिप्प णी करतात सारे,
संशयाने पाहणाऱ्या नजरांना
किती रें देवू? प्रश्नांची उत्तरे.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
=========





