0
4
0
9
0
3
अभिलाषा
Name & Fame ची….
कधीच नव्हती अभिलाषा
बस्स ओंजळीत मावेल इतके
दान पदरी पडावे हीच मनिषा
रोजचाच सूर्य उगवतो मावळतो
रोजचीच असते ही अभिलाषा…
पण अनुभवाचे घोट शिकवतो
कधी पहाट तर कधी असे निशा
तरीही जगायचे नित्य आनंदात
हेच शिकवती पहाटेचे सूर्यकिरण
अन् निशेतही मस्त जगायचेच…
जेव्हा असते चांदण्यांची पखरण
कोण अडवतो तुम्हा असे जगण्या
मनाचे तर तुम्ही राजेच असता….
राजेही तुम्ही सिंहासनही तुमचेच
मग उधार का ठेवायची अभिलाषा ?
वैशाली अंड्रस्कर
जि.चंद्रपूर
0
4
0
9
0
3





