
0
3
4
5
8
2
जिद्द
ऊठ मित्राआता । होवूनिया जागा
कामाला त्या लागा । लवकरी ॥१
आळशी वृत्तीला । सोडुनीया दयावे
उदयोगी बनावे । सदोदीत ॥२
ऐष आरामाचे । दिन ते येतील
कष्ट करशील । अगोदर ॥३
थोडातरी ध्यास । कार्याचा धरावा
पूर्ण तो करावा । अखंडीत ॥४
हार नको मानु । धीर नको सोडू
नाते नवे जोडू । प्रयत्नाशी ॥५
होशील सफल । जीद्द ठेव मनी
करावी आखणी । अभ्यासाची ॥६
मिळालेले यश । कामाची पावती
अशीच प्रगती । करू चला ॥७
दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
0
3
4
5
8
2