कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
बेडूक उड्या; माधुरी काळे
0
4
0
8
9
0
बेडूक उड्या
शाळेच्या आवारात
झाले होते चिख्खल
बेडूक उड्याची तेव्हा
वाटे करावी नक्कल
आला मग ऐकू मला
डराव डराव आवाज
वाटे चिखल खेळण्या
चढला बेडकाला माज
चिडवू लागला आम्हा
घेतो बघ उंच उंच उडी
पोरं बसतात म्हणाली
मारून मांडीची घडी
उगाचच नकोय पैज
बघ मारतोय उड्या
बाईचे लक्ष जाताच
पडल्या आम्हा छड्या
बाई करतो जी गृहपाठ
दंगा मस्ती आता बंद
शिस्तीने येतो शाळेत
अन् राहतो कामात दंग
सौ माधुरी काळे
वणी जिल्हा यवतमाळ
============
0
4
0
8
9
0





