0
4
0
9
0
3
पाऊस
पाऊस पडतो पहिला
धरणी ओलीचिंब झाली
आला मातीचा गारवा
तृण मखमली ल्याली
वृक्ष वेली तृप्त झाल्या
प्राणी पक्षी विहरती
हिरवागार हा निसर्ग
कोकीळ कुहूकुहू गाती
पावसाच्या पहिल्या सरी
वादळ वाऱ्याचा वर्षाव
ढग काळेकुट्ट होती
लागेना पाण्याचा ठाव
सारे होऊन आतुर
वाट पावसाची पाहती
आले भरून आभाळ
मुक्त सरी कोसळती
बळीराजा आनंदाने
करी पेरणी शेतात
पिकवी पिवळं सोनं
घाम गाळतो मातीत
अर्चना राजू ईंकने
लाखांदूर,भंडारा
========
0
4
0
9
0
3





