आभारीय मनोगत…..!; सौ.वैशाली अंड्रस्कर
प्रकाशमय करणारी ही तर फुलझडीची ठिणगी
आभारीय मनोगत…..!; सौ.वैशाली अंड्रस्कर
प्रकाशमय करणारी ही तर फुलझडीची ठिणगी
सध्या देशभरात दिवाळीचे प्रकाशपर्व. या प्रकाशपर्वाच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाच्या ‘आम्ही बालकवी’, समूहात विषय होता ‘फुलझडी’. विषय बघताच मन अगदी बालपणात गेले आणि दिवाळीनिमित्त फोडले जाणारे फटाके, रंगीबेरंगी चंदेरी सोनेरी फुलझड्या, काचेच्या बाटलीतून आकाशात सोडले जाणारे रॉकेट, घमेल्यात गरगर फिरणारे चक्र, सापाची गोळी, कारंजे उडवणारे अनार, दगड, हातोडी, अथवा बंदूकीने फोडल्या जाणाऱ्या टिकल्या असे एक ना अनेक फटाक्यांचे प्रकार नजरेभोवती फेर धरून नाचू लागले.
खरेतर आजकाल बाराही महिने तेरा त्रिकाळ काही ना काही उत्सव सुरूच असतो. पूर्वी दिपावली च्या मोसमातच फुटले जाणारे फटाके आजकाल लग्न बारसे, वाढदिवस, राजकीय विजयोत्सव या ना त्या कारणाने उत्सवाची मांदियाळीच सुरू असते. तरीपण आपण स्वतः अनुभवलेल्या दिवाळसणाची आणि फटाके, फुलझड्यांची गंमत काही न्यारीच.
आईच्या फराळ तयार करणे, घरकामात मदत करणे, सडा रांगोळी टाकणे, फुलांच्या माळा-हार, तोरणे बनविणे. अशा अनेक कामांतून वेळात वेळ काढून टिकल्या फोडणे, फुलझड्या उडवणे, सापांच्या गोळ्या जाळणे अशा अनेक अनुभवांनी आमचे बालपण समृद्ध झालेले होते. याच आठवणींचा थोडक्यात आढावा म्हणजे माझी ‘फुलझडी’ रचना. या रचनेची सर्वोत्कृष्ट रचना म्हणून निवड केल्याबद्दल मुख्य आयोजक व प्रशासक माननीय राहुल दादा, पाटील, मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे यांचे मनापासून आभार….!
तसेच मराठीचे शिलेदार समुहातील माझ्या वर अभिनंदनाचा वर्षाव करणारे दादा-ताई आपलेसुद्धा मनःपूर्वक आभार….!
सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह



