
0
4
0
9
0
3
आज आणि उद्या
जगू द्या मला ही आज,
सुखाच्या सुरात,आनंदाच्या स्मरणात ,
उद्या तुम्ही कराल जे काही ,
ते असेल केवळ माझ्या स्मरणार्थ.
पण आज, याक्षणी माझेच जगताना
तुम्हाला का दिसत नाहीत ?
अश्रूंच्या सावलीत दडलेले सत्य
तुमच्या नजरेस का भासत नाहीत?
मी देतोय माझं सर्वस्व
प्रत्येक हसू, प्रत्येक श्वास,
तुमच्या सुखासाठी जगतोय
स्वतःच्या वेदना गिळून खास.
माझ्या या आजच्या अस्तित्वाला
फक्त थोडीशी ओळख द्या,
उद्याच्या थंड शिलालेखांपेक्षा
आजच्या स्पर्शात अमरत्व लिहा.
जगणं जर उद्याच्या आठवणीसाठी असेल
तर आजचा श्वास व्यर्थ ठरेल,
म्हणून आज मला थोडं साथ द्या….
तरच मी उद्याही तुमच्या हृदयात धडधडत असेल.
डॉ राजेश काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर
0
4
0
9
0
3





