0
4
8
2
9
0
समजून कोण घेतंय?
सकाळी उठल्यापासून
कामे यंत्रासारखी भराभरा
प्रत्येकाच्या वेळा सांभाळून
आवरावा कामाचा पसारा
स्त्री असो गृहिणी,पगारी
घर सांभाळणे तिची जबाबदारी
मुलै,बाळे, वृद्ध,आजारी
कामाचे नियोजन नि तयारी
दिवस जातो संपूर्ण
करता सेवा शुश्रुषा
समजून कोण घेतय?
तिला हवा आराम दिलासा
नोकरदार भगिनींची तर
वाढते दुप्पट जबाबदारी
येता कार्यालयातून घरी
पदर खोचून कामाची तयारी
आईला कधी सुटी नसते
एकसारखी ती कामात असते
समजून घेवून तिच्या भावना
मदत तिला करायची असते
समजून घेतले परस्परांना
नांदेल घरात सुख,शांती
घर हे दोघांच असत
जपावी प्रेमाने सर्वांशी नाती
सुलोचना लडवे
अमरावती
0
4
8
2
9
0



