Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

समता सैनिक दलातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करून महामानवास अभिवादन

संविधान चौकात संपन्न झाले रक्तदान शिबीर

0 4 8 2 9 7

समता सैनिक दलातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करून महामानवास अभिवादन

संविधान चौकात संपन्न झाले रक्तदान शिबीर

तब्बल ४० युवक युवतींनी केले रक्दान

सविता धमगाये, प्रतिनिधी नागपूर

नागपूर: (दि.६ डिसे.): भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑल इंडिया समता सैनिक दल, नागपूर जिल्हातर्फे (दि ६डिसे) रोजी संविधान चौक येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने महामानवाला मानवंदना देण्यात आली.

नागपूर येथे संविधान चौकातील बाबासाहेबांच्या भव्य शिल्पाला मानवंदना देऊन रक्तदानाची सुरवात झाली. याप्रसंगी जवळपास चाळीस तरूण तरुणींनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले.

बुद्धीस्ट आंत्रप्रिन्युर्स असोसिएशन ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्री आणि ऑल इंडिया समता सैनिक दल, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मॉडेल ब्लड सेंटर शासकीय मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर तर्फे या उपक्रमा प्रित्यर्थ प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात आले.या उपक्रमात वरिष्ठ सैनिक कांतीलालजी भांगे,हरीश चाहांदे, सविता धमगाये, उज्वला ऊके, रवी नितनवरे, प्रदीप मून, मीना मून, माया तिरपुडे,ज्योती तिरपुडे,प्रशांत अधव, जे. ई. शेंडे,समीर रामटेके, चंचला मुरारकर, मायाताई उके,ममता नाईक,परिता झोडापे,विशेष उपस्थिती सैनिक डॉ.हिरेश नगराळे,आणि डॉ.मंदा नगराळे इत्यादी सैनिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे