0
4
8
2
9
0
उनाडक्या
उन्हाळ्याची सुट्टी
अभ्यासाशी कट्टी
मित्रांची जमे गट्टी
खेळाची वाजे शिट्टी
सकाळी मित्र
झाले गोळा
घरातच टी व्ही
पहिला थोडा
आंधळी कोशिंबीर
खेळ लागलो खेळू
इकडे तिकडे चहूकडे
सारे लागले पळू
सायंकाळी लागली
क्रिकेटची मॅच
जो तो धावतो
पकडायला कॅच
उनाडक्या करत
दिवसभर खेळलो
दमून भागून सारे
अंगणात झोपी गेलो
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
0
4
8
2
9
0



