
0
4
0
9
0
3
मजकूर
कळला नाहीच आज , तुझा दाटलेला उर।
मम या मनाने तुला,केव्हा दिला मजकूर।।
काटे रुतलेली जरी,वेदना जूणीच आहे।
तरी लोचनी अजूनी ,हुरहूर नवीच आहे।।
सोडून गेलीस तेव्हा, कळले नव्हते मला।
पुन्हा भेटायाचे तसे , ठरले नव्हते मला।।
स्वप्ने चंद्र तारकांचे,अंतरी जपून होतो।
चकणाचूर असून ,रात्र पांघरूण घेतो।।
विरहात वेदनांनी,खचलो मुळीच नाही।
एकटाच आठवांनी ,ढळलो मुळीच नाही।।
भाव अंतरीचे असे, तुला मला ना कळले।
आतूर मनोमनी तरी ,पाऊल नाही वळले।।
जीवनात संकटांना ,झेलून सावरु आता।
क्षितिज होऊन भेटू,सांजवेळ जाता जाता।।
गोवर्धन तेलंग
ता.पांढरकवडा
0
4
0
9
0
3





