ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल येथे ७६ वा गणतंत्र दिवस साजरा
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल येथे ७६ वा गणतंत्र दिवस साजरा
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
तालुका प्रतिनिधी, हिंगणा
नागपूर/हिंगणा: (दि २६ जानेवारी) अमनगर येथील ग्रेट स्कॉलर पब्लिक स्कूल येथे ७६ व्या गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. तसेच वर्षभरात शाळेत झालेल्या विविध उपक्रमांचे बक्षीस वितरण या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करून करण्यात आली व ध्वजारोहण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गोतमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वानाडोंगरी न.प.चे माजी बांधकाम सभापती नितीन साखळे, सौरभ झा, व अतिथी म्हणून अजय रहिले, मनोज पिपरेवार, उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी सौरभ झा यांनी देशाकरिता बलिदान देणाऱ्या व राज्यघटना तयार करून जनतेला संविधान तयार करून देणाऱ्या महान हुतात्मा परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन केले व यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी शाळेचे संचालक कमलेश खोब्रागडे, मंगेश आंबुलकर, वर्षा खोब्रागडे, ममता कटरे, रूपा बोटकावार, हिना रियल, मीना कुशवाह,रिना यादव, देवानंद राम, सुनिता बिजेवार, राहुल मेश्राम, श्याम भगत व मोठ्या संख्येने विद्यार्थी , पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.





