
0
4
0
9
0
3
झेप
सरड्याची धाव नको
गरूडाची झेप घ्यावी
गगन कवेत घेण्याची
शक्ति युक्ती शिकावी.. //
मर्यादेच्या सीमारेषा
नको गोल आखायला
आहेत इथे मुक्त तुला
दश दिशा माखायला… //
क्षितिजापार उड जरा
जिद्द सारी एकवटून
बळ तुझ्या पंखातले
बघ जरा अजमावून… //
विश्व सारे खुणावतेय
नजर तुझी विस्फारेल
हीच खरी संधी समज
क्षेत्रही तुझे विस्तारेल… //
शोध कधी संपूच नये
जीवन ठरो ध्यासपर्व
बोध घ्यावा इतरांनी
वाटो तुझा यथार्थ गर्व… //
विष्णू संकपाळ,बजाजनगर
ता. जि.छ. संभाजीनगर
========
0
4
0
9
0
3





