विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची डॉ. विजया ठाकरे यांनी रूग्णालयात घेतली भेट
भिमराव मेश्राम प्रतिनिधी
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची डॉ. विजया ठाकरे यांनी रूग्णालयात घेतली भेट
गडेगाव येथील मुलांनी ब्लॅकबेरी सदृश्य फळ खाल्ल्याने झाली विषबाधा
भंडारा: जिल्हा परिषद शाळा, गडेगाव येथील काही विद्यार्थ्यांनी (दि.५) जामुन समजून काही रानटी जंगली प्रकारचे फळ ब्लॅकबेरी सारखं दिसत असलेलं त्यांच्या खाण्यात आलं होतं त्याच्याने त्यांना विषबाधा झाली होती.
डॉ. विजया ठाकरे नंदुरकर जिल्हा सचिव भाजप भंडारा यांनी या विद्यार्थ्यांची भंडारा जिल्हा रुग्णालय येथे जाऊन भेट घेतली. या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन, सीएस साहेब डॉ. सोयाम सर यांच्यासोबत भेटून चर्चा केली.
विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे तर, काही विद्यार्थ्यांना सुट्टी झालेली आहे. काही विद्यार्थी अजून आहे तिथे परंतु त्यांचे प्रकृती आता सध्या स्थिर आहे व्यवस्थित आहे. याप्रसंगी गडेगावचे ग्रामपंचायत सदस्य श्री सचिनभाऊ कुथे, श्री संजयजी सावरकर, श्री उके भाऊ ,जिल्हा परिषद शाळा कडेगावचे मुख्याध्यापक शरद भाजीपाले सर उपस्थित होते.





