शबनम
किती मजेदार होते
दिवस हो.. ते आधीचे,
एका छताखाली सारी
जिव्हाळ्याने राहायचे..!!१!!
पुस्तक, पाटी, पेन्सिल
शबनममध्ये भरायचे,
चिंचा, बोरं, रानमेवा सारं
खातखात शाळेला जायचे..!!२!!
जुनं ते सोनं असं तेव्हा
फुकट नाही म्हणायचे,
पोटच्या पोरावाणी सारी
जुन्या वस्तूंनाही जपायचे..!!३!!
शबनम खांद्यावर लावून.
कवी संम्मेलनाला जायचे,
साहित्याच्या पंक्तीत तिला
तेव्हा सन्मानानं बसवायचे..!!४!!
बहरणाऱ्या प्रतिभेचा
कधी शृंगार बनायचे,
विश्वाच्या वणव्याला
कवितेतून विझवायचे..!!५!!
स्वातंत्र्याची खलबतेही
सारी तिच्यात शिजायचे,
तंबाखू, पान-सुपारी चघळत
अनेक ज्येष्ठ बाता करायचे..!!६!!
बसून खांदी पत्रकारांच्या
अन्यायाला वाचा फोडायचे,
गर्व ना कसला तिजला
साधेपणालाही जपायचे..!!७!!
प्रयोगशाळा वैज्ञानिकांची तर
कुंचला चित्रकाराचा बनायचे
समाजसेवक पोस्टमनच्या
खजिन्याला तिनं खोलायचे ..!!८!!
सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
=========





