Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

स्त्रीशक्तीचा जागर

उर्मिला गजाननराव राऊत फ्रेंड्स कॉलनी नागपूर

0 4 0 9 0 3

स्त्रीशक्तीचा जागर

नवरात्री, नवरात्री नारीशक्तीचा जागर रे,
देवी माझी, शक्ती माझी,प्रत्येक हृदयात जाग रे//धृ//

शैलपुत्री निर्धाराची,
संकटाशी करते लढाई,
स्त्री घडवी नवा इतिहास,
पहिली ज्वाला प्रगतीची कमाई//१//

तपशक्ती ब्रह्मचारिणीची,
नियम, संयम, ज्ञानाची वाट,
स्त्रीमनातील आत्मबळ जागे,
कन्या-विदुषी, उजळे शक्तीचा घाट//२//

चंद्रघंटेची गर्जना ऐक,
सत्याची मशाल हाती,
अन्यायाची घडी मोडुनी,
ज्वाळांत जळे असत्याची वाती//३//

कात्यायनी रणांगणात,
सिंहगर्जनेचा गगनी जागर,
अधर्म, शोषण, अन्याय तोडते,
स्वातंत्र्याचा उजळे सागर//४//

सिद्धिदात्रीची कृपा घेऊन,
नवदुर्गा उभी आज,
उत्सव नाही – जागृती ही,
ज्ञान-करुणेचा नवा आवाज//५//

उर्मिला गजाननराव राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे