Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट नऊ????????????*

*☄विषय : फुशारकी☄*
*????शनिवार : २१ / डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*फुशारकी*

हातात नाही आना
अन् लोकां दाखवे बाणा
दुसऱ्याच्या जीवावर चाले
युक्त्या त्याच्या नाना

नोकर चाकर हाताशी
लोकास तो सांगत राही
पट्टा तोंडाचा चालू ठेवत
फिरत होता दिशा दाही

खोटं नाटं बोलत बोलत
प्रभाव आपला पाडत होता
फुशारकी मारून मारून
थकून मात्र जात नव्हता

फाटक तुटकं झाकत होता
नाकी नऊ आले तरी
छोट्या गोष्टी मोठ्या करी
मीठ मसाला लावून खरी

खिसा कोटाचा फाटलेला
हात घालून चाले ऐटीत
साहेबा सारखा थाट दाखवून
सांगे दुसऱ्या जगण्याची रीत

अरे नको दिखावा दाखवू
खऱ्या विश्वात रमावे
खोट्याचा सहारा घेत
नकोच मोठेपणाचे सोंग धरावे

*रेखा सोनारे*
*ता. जि. नागपूर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

असे जगी किती असती?
आधी केले मग सांगितले
कृती करण्यापूर्वी यांनी
फुशारकीचे तंत्र अवलंबिले

वारेमाप आश्वासने देऊन
मतांसाठी फुशारकी किती
एकदा सत्ता हातात येताच
नेते आश्वासने विसरून जाती

टिमकी बजावण्यात किती
पटाईत असतात माणसे
आपली वृथा स्तुती करून
मूर्खच ठरतात ही माणसे

आंबेडकर, फुले, गांधीजींनी
परोपकारार्थ देह झिजविला
समाजसेवा व्रत अंगिकारूनी
मानवतेचा जगी दीप लाविला

आमटे दांपत्य, सिंधुताईंपरी
समाजसेवक कार्य करती
कार्याचा यांच्या दरवळ
दशदिशा उधळत असती

नलगे यांना बढाई, प्रसिद्धी
कार्यच यांचे बोलत असते अनाथ,
अपंगांच्या जीवनी
आनंदाची ज्योत सदा तेवते

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

कर्तृत्वाचा नाही थांगपत्ता
फुशारकी मात्र गगनभेदी
गाडीखालच्या श्वानासारखी
बिनकामाची अशीच प्यादी

बोलाचा भात नि कढी बोलाची
प्रत्यक्षात कामाचा नसे थांगपत्ता
दुसऱ्यांकडूनच होती कामे
लबाडांचा ‘मी’पणाचा कित्ता

असावे बंधन फुशारकीला
नको व्हायला चारचौघात हसे
समजू नये येडेगबाळे जनांना
स्वतःच स्वतःच्या बोलात फसे

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी
नको नको ते उद्योग करशी
मोजून आठ हात लाकडाच्या
नऊ हात ढलप्या का काढशी

ओळखून घे स्वतःला माणसा
स्वरुप पाहून ठेव जरा वर्तन
चाल सत्याची ती पाऊलवाट
आतून तमाशा नको वरुन कीर्तन

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

डोनाल्ड ट्रंम्प चा मित्र मी
राष्ट्राध्यक्षांमध्ये उठतो बसतो
एक नाही देश माझा
विश्वात साऱ्या फिरत असतो

माहित नाही पोहोच माझी
ओळखले नाही तुम्ही मला
अरबो खरबो पती सारे
असतात माझ्या दिमतीला

चमचमणारे गगण माझे
मला कशाची वाणवा
आडवे जाईल कोणी तर
बनेल माझा निशाणा

पाहताच सारी मंडळी
करते झुकून मला सलाम
बसून फक्त आज्ञा सोडणे
इतकेच तर माझे काम

बढाईखोर येऊन एक
बढाया मारून गेला की
समजली त्याची सर्वांना
एका क्षणात फुशारकी

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*फुशारकी*

उगाच फुशारकी मारून
करतो स्वतःचे कौतुक
बढाया मारून मारून
कुणाशी ना सोयरसुतुक

एक दिवस खुलते पोल
ओळखू येतो खोटेपणा
किती करशी चलबिचल
माने ना कुणी तुझा बाणा

उगाच ऐट दाखवून
नको करू चतुराई
भान वास्तविकतेचे
ठेवून कर धिटाई

मिळत नाही यश कधी
उगाच करून चढती
सत्य आणि निस्वार्थपणा
देतो जीवनात बढती

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

अगणित गप्पा नि हसणं
कर्तव्यात कुठे बसणं….
गावात घरात नाही किंमत
वाईट कर्मात पुढं असणं…

वाढदिवस भारी करणार
गावाला जेवण घालणार…
बायको लेकरं उपाशी
फुशारकी जगाला सांगणार..

हिकडं बघा हिकडं बघा
स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालणार
सावित्रीच्या लेकींची
निंदा मात्र करत बसणार…

जखमेवर मीठ चोळणार
फुकटात खायचं बघणार…
गरिबीचा अपमान करून
पर दुःखावर खीं खी हसणार…

उणं दुणं काढण्यात माहीर
स्वार्थ..लोभ पैसा काढणार
मीच कसा मोठा म्हणून..
माणुसकीला काळीमा फासणार

कलियुगातील हे दानव
रावणाचे खरेखुरे पुत्र….
कधी होतील मानवातले मानव
श्री रामासारखे सुपुत्र…..

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

संसारात आनंदी राहावे
सामाजिक कार्य करावे….

कोणतेही कार्य करताना
लाज वाटू द्या फुशारकी मारताना…

फुशारकी नको कधीच
समाजात नाव व्हावे नक्कीच…

खूप खूप काम करावे
स्वतःच्या पायावर उभे राहावे…

ज्ञान सागरात मुक्त नहावे
हवे ते ज्ञान प्राप्त करावे….

समाजाची सेवा सदा करावी
आनंदाची देवाण घेवाण असावी…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

फुशारकी मारण्यात हल्ली
पटाईत झाली हाय माणसं
आपलाच बडेजाव सांगत
फिरतात लय चतुर माणसं

नऊ हात लाकूड असतांना
काढतील दहा हात धिपली
खूप पराक्रम करतोय जणू
ही गोष्ट तरी पाहिजे पटली

मी मोठा माझी लय ख्याती
आपणास ओळखतात सारे
आपला दरारा रुबाब पाहून
करतात सगळे मलाच मुजरे

स्वतः अज्ञान ठेऊन बाजूला
ज्ञानडोस पाजती दुसऱ्याना
आडात नाही पोहऱ्यात कसे
कसं समजनाय फुकट्याना

बढाई मारतात मोठ्या गप्पा
बोलाचा भात बोलाची कढी
पितळ उघडे पडेल कधीतरी
वळायला लागते मग बोबडी

फुशारकी मारणं सोडून द्यावं
चालवू नये सदा आपला हेका
लोक ही वेडी राहिली नाही
कोणालाही कमी समजू नका

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

आपल्या अस्तित्वाच्या लढ्यात,
कुणी दावतेय हुशारकी…
जे कधीच केलेच नाहीच,
तरी मारतात *”फुशारकी”* …१

वडिल भावाच्या कर्तव्यात,
केले कित्येक कसुर तरी…
छाती ठोकून सांगतो आहे,
माझी वृत्ती शत टक्के खरी…२

संधीसाधू संधी शोधतोय,
मुर्ख बनवाया प्रजा सारी…
सोडून देतसे वाऱ्यावर,
फिरावया त्यांना दारोदारी…३

सांभाळून वागणे लागते,
चक्रव्यूहाच्या त्या कारस्थानी…
*”सुधाकरा”* येथे क्षणोक्षणी,
व्यवहार चाले सुलतानी…४

*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖

*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे