बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*
*🥀विषय : पापणकाठ*🥀
*🍂बुधवार : ०९ / एप्रिल/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पापणकाठ*
आठवणीत तुझ्या
देह हा क्षीण झाला
मृगजळ जणू तू
पापणकाठ ओलावला
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
आठवणीत प्रियतमा
ओलावतात पापणकाठ माझे
कितीही प्रयत्न केला तरी
नाही विसरता येत रूप तुझे
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
मनांगणात दाटून आले
तुझ्या आठवांचे धूके दाट
स्मृतीगंध हृदयात विसावला
ओलावली मम पापणकाठ
*सौ.आशा कोवे-गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿
*पापणकाठ*
नातेसंबंधांना प्रेमाने भरतांनाच
आईचे पापणकाठ ओलावतात.
नाराज झालेल्यांना पापण्याही
आईकडे नकळतच बोलावतात.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*४,शारदानगर,चोपडा*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿
*पापणकाठ*
*तुझ्या आठवणींनी होतात*
*पापणकाठ ओले*॥
*कधी शब्दांच्या जागी*
*आसवेच सकल व्यथा बोले*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. ‘अभिजात मराठी २०२५’ विशेषांकासाठी साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पापणकाठ*
हसून काहीतरी बोलत जा
आनंदाने काही टाळत जा
पापणकाठ अश्रूंनी ना भरावा
काही निर्णय काळावर सोडत जा
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿
*चारोळी –पापणकाठ*
प्रत्येक लाट तुझ्या स्मृतीची
सख्या तुला देते आर्त हाक
अश्रुंचा सागर डोळ्यात
भिजवितो पापणकाठ.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





