
0
4
0
9
0
3
नेत्रदान
वर्षामागून वर्ष चाललीत
ती तमात चाचपडत आहे
नंबर अजूनही तिचा
वेटींग लिस्टवरच राहे..
संपेल का कधी तिचा
काळोखाचा प्रवास
नेत्रदानाआधीच आपुला
थांबेल काय तो श्वास..
डोळे नाहीत तिला
आस लावलीय तिने
देईल कुणीतरी डोळे
मरणोत्तर ती दाने..
घोर अंधारातही पाहतेय
ती सुखस्वप्नांची सृष्टी
पण…
नेत्रदान करण्या जनात
आहे का ती दृष्टी..
वाटून घ्याव्या अंधत्वाच्या
वेदना थोड्या काही
इतके डोळस आपण
अजून झालोच नाही..
यायलाच हवा आता
ती दृष्टी, तो डोळसपणा
करून नेत्रदान मिटवूया
अंधारयात्रींच्या यातना..!
स्वाती मराडे,
इंदापूर पुणे
0
4
0
9
0
3





