
0
4
0
9
0
3
हपापलेले
जन्मभर हपापलेले जे
वेदनादायी अंतिम क्षण,
नाही मोहमाया किंचित
देव करितो त्यांचे रक्षण…!!१!!
हपापलेपण जया जडला
बरा न होणारा मनोविकार,
नाही जालीम औषध असे
जया पैसे धनाची हाव फार…!!२!!
खून, मारामारी नि काहीही
सत्ता संपत्तीसाठी करणार,
नाही बघवत त्या विधात्याला
पापाचा घडा निश्चित भरणार…!!३!!
हपापलेपणानेच हुंडाबळी
अजूनही समाजात घडतात,
टोमणे मारून विनाकारण
माहेरचीच इज्जत काढतात…!!४!!
स्वाभिमानी व्यक्ती कधीच
नाही करणार हपापलेपण,
परिणामाची जाणीव ठेवून
सुधारायला हवे दुष्ट वर्तन…!!५!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता.जिल्हा बीड
0
4
0
9
0
3





