
0
4
0
8
9
0
नजाकत
नजाकत शब्दाचा अर्थ
तसा आहे फार गहन
हा फक्त एक आभास,
ज्याने प्रसन्न होतं मन
नजाकतीने बांधल्या जातात,
ऋणानुबंधाच्या गाठी
हृदयाला, हृदयाशी जोडतात,
कित्येक जन्मासाठी
नजाकतीने बोलणे, लिहिणे
प्रत्येकाला अवगत नसते कला
शब्दा शब्दातील लय गरिमा
भिडते जाऊन थेट हृदयाला
नजाकतीनेच सजल्या असतात
जीवनाच्या वळणवाटा
कधी मखमली फुलवाट
कधी रूततो पायाला काटा
नजकतीनेच भरले असतात
आयुष्यात प्रत्येक रंग
प्रत्येक क्षण अनुभवायचा असतो
आनंदाने आप्तस्वकियां संग.
इंदू मुडे, ब्रम्हपुरी
चंद्रपूर
=======
0
4
0
8
9
0





