ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनांदेडमराठवाडासाहित्यगंध
शक्तीस्थापना
बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0
4
0
9
0
3
शक्तीस्थापना
आदिमाया तू जगाची
सद्बुद्धी दे दानवांना
पावण हो माता आम्हा
करतो ही शक्तीस्थापना
संहार कर दुष्टजनांचा
मुक्ती मिळू दे सकलांना
अवतार तुझा भवानीचा
मनोभावे करतो स्थापना
रुपे तुझी अनेक येथे
नवरात्रीचे नवरंग छान
मुक्ती मिळे नारीशक्ती
दुर्गापूजेचा अभिमान
जिजाऊ सावित्री भिमाई
झाशीची राणी लक्ष्मीबाई
अहिल्यादेवी बहिणाबाई
तुझ्याच रुपात माझी आई
सोहळा अंबाबाई तुझा
नेमाने बघ करतो साजरा
विनवणी या भक्तांची तुज
व्हावे कुशलमंगल या धरा
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=======
0
4
0
9
0
3





