ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनबीडसाहित्यगंध
खुशीला काही कारण नसतं..
शर्मिला देशमुख -घुमरे ता.केज जि.बीड

0
4
0
9
0
3
खुशीला काही कारण नसतं..
खुशीला काही कारण नसतं हो
फक्त खुश होता आलं पाहिजे
छोट्या छोट्याशा गोष्टींवर
मन मात्र जायला पाहिजे
सुगंधच घ्यायचा म्हटलं तर
वाळलेल्या फुलातूनही घ्यायला पाहिजे
गवतातील फुलालाही शोधण्याची
किमया सुद्धा जमायला पाहिजे
माणसं सगळी चांगलीच असतात
चांगुलपण शोधता आलं पाहिजे
असतातच की गुण वाईटांमध्येही
गुणांनी गुणाला वळवता आलं पाहिजे
सौंदर्याचं काय घेऊन बसलाय
निसर्ग चौफेर सौंदर्यच उधळतो
गर्व कशाला नश्वर शरीराचा
क्षणात भस्मसात आगीत जळतो
नजर मात्र पाहिजे शोधक
प्रत्येकाच्या दृष्टीत प्रत्येकजण वेगळा असतो
समजून घ्यायचा फरक इतकंच
जो तो स्वतः साठी बरोबरच असतो
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
=======
0
4
0
9
0
3





