0
4
8
2
9
0
निर्भयता
हरवले ते कधी
पुन्हा मिळणार नाही
अघटीत घडले ते
पुन्हा घडणार नाही
तुटला किनारा त्या
सरितेच्या महापुराने
त्या नदीला हे दुःख
कधी करणार नाही
कोलमडून पडला त्या
वृक्षाचा प्रचंड डोलारा
सैरावैर वाहणारा पवन
त्यास कधी स्मरणार नाही
एकटा पडला नभी
तो खुळा पक्षी
पक्षिनी त्या विरहात
कधी जळणार नाही
झेलीत जीवनात अखंड
संकटांची मालिका
त्या संकटा समक्ष
तो कधी झुकणार नाही
पंकज रामकृष्ण चारथळ
बजरंग नगर, कोराडी रोड नागपूर
=========
0
4
8
2
9
0



