
0
4
0
9
0
3
आंदोलन
अन्याय अत्याचार वा दुराचार
उच्छाद मांडतो जेव्हा स्वैराचार
मानवता येथे होते लाचार
पेटते आंदोलन होउन सहविचार ॥
सत्ता होता हुकूमशाही
समाज पोखरते बेबंदशाही
पर्यावरणास धोका काही
आंदोलन घडता समतोल राही ॥
सहणशीलतेचा होतो विस्फोट
एकतेने येतो घडून महास्फोट
अंधाधुंदीचा करण्या कडेलोट
जनसमुदायाचा पसरून लोट ॥
इतिहासाची पाने चाळता
आंदोलनाची परिणामकारकता
कळेल तेव्हा त्याची दाहकता
कशास छेडावी नितीमत्ता ॥
आंदोलन असती शस्त्र धारदार
शत्रुत्व परास्त करण्या आरपार
हक्क न्याय आणि सदाचार
होतो विजयी उत्तम सुविचार ॥
वर्तमानाचा विचार करता
भूतकाळाला पुन्हा स्मरावे
जात धर्म पंथ विसरुनी
स्त्रीरक्षणार्थ आंदोलन छेडावे ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
============
0
4
0
9
0
3





