उत्तर नागपूरच्या विकासासाठी ‘एन आय टी’वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य मोर्चा
रजत डेकाटे, प्रतिनिधी
उत्तर नागपूरच्या विकासासाठी ‘एन आय टी’वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य मोर्चा
रजत डेकाटे, प्रतिनिधी
नागपूर: शहरातील उत्तर नागपूर (कळमना) येथील प्रभाग 4, वांजरा परिसर, गुलशन नगर, पार्वती नगर या भागात गेल्या 25 वर्षापासून रस्ते व गडर लाईनचे व इतर विकासाचे कामे होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपुर शहराच्या वतीने नागपूर सुधार प्रन्यास मुख्य कार्यालय येथे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर महिला शहराध्यक्ष सुनिता येरणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढून नासुप्र सभापती संजय मीणा यांना निवेदन देण्यात आले.
उत्तर नागपूरातील प्रभाग 4 मध्ये वांजरा परिसरात रस्ते, गडर लाईन, पाणी, वीज ही समस्या गेल्या 25 वर्षापासून आहे, पावसाळयात नागरीकांना चिखलातून प्रवास करावा लागतो, चालण्यासाठी रस्ते नसल्याने रूग्णवाहिका असो किंवा अग्नीशामक दलांचे वाहने या परिसरात कुठेच जावू शकत नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे, गडर लाईन नसल्याने पाणी साचलेले असते, डेंगू, मलेरिया इतर रोग मोठया प्रमाणात या भागात पसरले आहे या सर्व समस्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सभापती यांना दिले.
सभापती यांनी नागपुर महानगर पालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांची संयुक्त मिटिंग घेवून या भागातील समस्या तात्काळ सोडवू असे आश्वासन दिले. नागपूर सुधार प्रन्यास तर्फे नियमितकरणाकरीता अर्जाचे 3 हजार शुल्क घेण्यात येत आहे त्या बद्दल नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, या बाबत प्रशांत पवार यांनी सभापती यांना विचारना केली असता, भुखंड मोजणी करीता हा शुल्क आकारण्यात येत आहे आणि 56 रूपये स्के फुट प्रमाणे विकास शुल्क आकारण्यात येईल असे सांगितले घेण्यात येणारे 3 हजार रूपये बद्दल लवकरच वर्तमानपत्रात जाहिरात देवून नागरीकांना माहिती देवून गैरसमज दूर करू असे सभापती यावेळी म्हणाले.
या मोर्चा मध्ये उत्तर नागपुरातील नागरीक, महिला, राकांपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक तानाजी वनवे, महासचिव दिनेश रोडगे, उत्तर अध्यक्ष राकेश बोरीकर, मध्य अध्यक्ष रवि पराते, पूर्व अध्यक्ष अमरीश ढोरे, व्यापारी आघाडी अध्यक्ष आशिष मदान, राजु मिश्रा, विशाल गोडाने, राहुल कामळे, ब्रह्मानंद मस्के, भारती गायधने, मनिषा शाहु, रेखा चरडे, विश्वास पक्किडे, सलाम शेख, कपील मेश्राम, विजय जकतीर, शेखर भेंडेकर, चंद्रशेखर मांडवकर, मुरलीधर निखारे, आनंद मेश्राम, शोभा येवले, संगीता अंभारे, अनुपमा डोंगरे, ज्योती कावरे, भाग्यश्री पंचबुधे, रामदास अहरवाल, गणेश काकडे, उमाशंकर विश्वकर्मा, पिंकी हटेला, नइम खान, विशाल सेलोरे, पुरचा मेश्राम, शशीकला जनबंधू, बसीर खाना, नाना कावळे, लता दामले, प्रणाली जांभुळकर, नितीन धकाते, मनिषा राऊत, मनोज बिसेन, नावेद खान, संतोष वर्मा, स्वप्नील वासनिक, सुधीर बडगे, संदेश खोब्रागडे, जुनेद खान, अनिता सिन्हा, सुनिता चौधरी, कविता वर्मा, संतोषी सिन्हा, बिसेन वर्मा, सरस्वती सिन्हा, संतोषी शाहु, आबीदा शेख, रवि शाहु, गायत्री निर्मलकर, रेवती शाहु, सावित्री धनगर, लक्ष्मी तराळे, भुवनेश्वरी देवांगन, यशोदा बावने, अख्तर शेख, प्रेरित देशभ्रतार, निशा मौदेकर, शेवंती पौनीकर, राजा बावने, सुनिता पाल, दिनेश बारापात्रे, रोमाना शेख, लक्ष्मी शाहु, रितिक बारापात्रे, इमरान शेख, मिलिंद महादेवकर, निलिकेश कोल्हे व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.





