
आपुलकी
नात्यातील आपुलकी आता झालीय कशी लोप
राजमहालात माणसा कशी लागेल तुला झोप !!धृ!!
माणुसकीचा झरा कसा आटतच चाललाय
चिंताग्रस्त जीवन झालंय अविश्वास वाढलाय
संपत्तीसाठी सख्ख्या भावात भांडणं वाढलीत
आपुलकी कुठे गेली सांगा नात्यांना लाजवीत !!१!!
आपुलकीचा लोकं खोटा कसा आव आणतात
जिव्हाळ्याचे भाव दाखवून कसं मनातील जाणतात
तोंडावर आपुलकी दाखवून मग डाव रचतात
गोत्यात माणूस आल्यावर दुरून खेळ बघतात !!२!!
आपुलकी हृदयी नसताना कशी माणुसकी वाढेल
बंधुभाव नसताना समतारूपी समाज कसा घडेल ?
जाती धर्म विरहीत समाजाची उभारू या गुढी
आपुलकी लोप पावल्याने बेवारस पडतात मढी !!३!!
रोजचंच मढं अन् त्याला कोण रडं म्हणून माणुसकीची खिल्ली
आपुलकी नसणा-यांना त्यांचीच ओळखल का रे गल्ली
माणूस बुद्धिमान म्हणून मारता फुकटची फुशारकी
माणुसकीचं बीज रूजविण्या दाखवावी रे आपुलकी !!४!!
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=========





