ई-पेपरकविताचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध
पारदर्शक मी समजत नाही
राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर

0
4
0
9
0
3
पारदर्शक मी समजत नाही
गमतीने बोललो असेल कधी,
पण कुणाचे मन दुखावले नाही
कुणाच्या भावना दुखावतील
असंही वागलो नाही
काचेसारखा पारदर्शक स्वतःला
पाण्यासारखा निर्मळ समजत नाही
तुमच्यात मिसळणारा मी
स्वतःला वेगळा समजत नाही
थोडा खोडकर विनोदी
पण स्वार्थ माझ्यात नाही
आतून रडत असलो तरी
दुसऱ्यांना रडवत नाही
कार्य असो कुठले पण
नाही म्हणून म्हणत नाही
होते थोडी अडचण तरीही
कार्य अर्ध्यातून सोडत नाही.
राजेश लक्ष्मीकांत धात्रक,
ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर
0
4
0
9
0
3





