
परतीचा पाऊस
पावसा का विसरला,तुझ्या परतीच्या वाटा।
आता तुझ्या प्रकोपाने,नेत्री अंतरीच्या लाटा।।
रोज रोज असे तुझे, वागणे बरेच नाही।
भावनांना विसरून,खेळणे बरेच नाही।।
शिवार हिरवं होतं , उरलं मुळीच नाही।
खोदून गेलास तु, मुरलं मुळीच नाही।।
घरोदारी चुल आता , सगळे विझून गेले।
शिजले भांड्यात होते,आधी उसवून गेले।।
महालात झोपडीत, हाहाःकार ऐकू येतो।
दुर माय लेकरांना , तु करुनी झोप घेतो।।
पेरलेले बिज होते , उगवून आनंदाने।
निळ्या नभी घात केला, तु की माणसाने।।
मनी तुझ्या पावसारे, येतील यौवन कळा।
धरेच्या कुशीत आहो,तुच होशील वेगळा।
मनमानी करु नको ,धरु नको अट्टाहास।
तुझ्यानेच कोंडताहे , आम्हां प्रत्येकाचे श्वास।।
थबकून कसा आहे,कर विचार स्रुष्टिचा।
आंधळा कसारे झाला,बघ टाहो द्रुष्टिंचा।।
रौद्रभीषण पाहूनी , धरणी थरथरते।
पंचतत्वात स्वतः,श्रेष्ठ कसा समजते।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा , जि यवतमाळ
=========





