0
4
8
2
9
0
मन मारूनच ना
चढली ती सुकुमारी
लग्नाच्या बोहल्यावर
झोके घेत हरिणीसम
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
ती आली माप ओलांडून
बंध माहेरचे सोडून
मन खेचत होते मागे
सासर नेत होते ओढून
चार दिवस नवलाईच
सपंले एकाच क्षणात
वास्तवाच्या भूमीवर
येत झेलले आघात
पूर्वापार रूढीच्या
नावाखाली हळूवार
कारभारणी नावापुरती
तिला कशात नाही फार
माय सांगे लेकीला
अब्रू माहेराची राख
झाला त्रास किती जरी
सर्वांसमोर मोकळे हास
सविता धमगाये,नागपूर
===========
0
4
8
2
9
0



