
0
4
0
9
0
3
झिपरी
या उकिरड्यावर ..
त्या उकिरड्यावर ..
फाटकी झोळी घेऊन
शोधते चतकोर ढिगातून
चार घासांची भूक ही..
करायला लावते वणवण
माय गेली देवा घरी…
अंध अधू बापाचं लाचारपण
नाही निवाला..नाही निवारा
झेलते थंडीऊन पाऊस मारा
दारिद्याच्या या शुष्क वाटेवर..
‘झिपरी’ झालीय रे मी आता..
जीणं सावरण्या या लटांना
सांग आणू कुठला कंगवा?
झिपरेपणाचा लेबल लावूनी
पोटासाठी फिरते मी मारा मारा
तारका रुखमोडे
अर्जुनी जि. गोंदिया
0
4
0
9
0
3





