
0
4
0
9
0
3
थोरवी स्त्रीत्वाची
हसरा चेहरा नेहमी
हृदयात जरी वेदना..
सहनशील निरंतर
कशाही असो यातना..
स्वतःच्या पिल्लांना जपणारी..
आई,बहिण,कन्या होऊन जगणारी.
अंगी तिच्या अती शालीनता..
सह्याद्रीच्या रक्षणाला जन्मली
जिजाऊ होऊन माता..
शिवबाला एकटीने वाढवले..
दिल्लीचे तख्त ही हलवले..
मराठी मुलुखाच्या झेंड्याला
अटकेपार नेले..
डाॅआनंदी बाई, सावित्री माई
मदर तेरेसा, सिंधू ताई ..
लतादीदी अन् रमाबाई..
किती वर्णावी थोरवी स्त्रीत्वाची.
ह्या प्रेरणा देती आम्हां जगण्याची..
मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड
========
0
4
0
9
0
3





