शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला 9 सप्टेंबर पर्यंत स्थगिती
जितेंद्र देविदास खोर विरुद्ध महाराष्ट्र शासन यांच्या याचिकेवर स्थगिती आदेश

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला 9 सप्टेंबर पर्यंत स्थगिती
जितेंद्र देविदास खोर विरुद्ध महाराष्ट्र शासन यांच्या याचिकेवर स्थगिती आदेश
पुणे: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर स्थगिती आदेश प्राप्त झाला आहे. यांच्या याचिका प्रमाणेच इतर १० याचिका यांनाही त्यामध्ये अंतर्भूत करण्यात आले असून हा स्थगिती आदेश 9 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेला आहे.
त्यामुळे शासन आदेशाप्रमाणे सर्व राउंड ऑनलाइन पूर्ण झालेले नसल्यामुळे कोणत्याही शिक्षकाला कार्यमुक्त करणे हे सुद्धा पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग बनू शकते. काही शिक्षकांना कार्यमुक्त करून काही शिक्षकांना जागेवर ठेवणं हा जीआर मध्ये नमूद नसल्यामुळे जीआर च्या सर्व नियम फॉलो होत नाहीत.त्यामुळे सध्या तरी बदली प्रक्रिया थांबलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
त्यामुळे आपण सध्या ज्या शाळेवर आहोत त्या शाळेवर आपण पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात करूयात. स्थगिती आदेश उठल्यानंतर पुन्हा त्यावर सुनावणी होऊन तारीख पे तारीख पडू शकते. त्यामुळे आता सर्व काही राम भरोसे म्हणण्यापेक्षा न्यायालयीन भरोसे म्हणायला काहीही हरकत नाही असे दिसत आहे.
हा स्टे वैयक्तिक दिसत नसून त्यामध्ये इतरही १० याचिका अंतर्भूत की (ज्यांचा सर्वांचा सेम प्रॉब्लेम आहे ) असल्यामुळे हा स्टे संपूर्ण बदली प्रक्रियेला दिसून येत आहे. याचे स्पष्टीकरण विनसिस कडून येऊ शकते.
ग्रामविकास विभाग सध्या तरी यामध्ये लक्ष घालीन असं दिसत नाही. सध्या तरी सर्व शिक्षकांनी आपापल्या शाळेवर निरागस मुलांसमोर आपले काम चालू ठेवायला काही हरकत नाही.





